गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 13 ऑक्टोबर 2022 (13:33 IST)

कियारा या दिवशी लग्नगाठ बांधणार सिद्धार्थसोबत

Sidharth Malhotra Kiara Advani marriage
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनीही करण जोहरच्या शोमध्ये आपल्या नात्याची कबुली दिली आहे.
 
यापूर्वी कियारा आणि सिद्धार्थच्या ब्रेकअपच्या बातम्याही समोर आल्या होत्या. पण आता त्यांच्या लग्नाची बातमी व्हायरल होत आहे.
अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, सिद्धार्थ आणि कियारा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.
हे जोडपं एप्रिल 2023 मध्ये सात फेरे घेऊ शकतात असे सांगण्यात येत आहे.
दोघेही दिल्लीत लग्न करणार, कारण सिद्धार्थचे कुटुंब दिल्लीत राहते.
सिद्धार्थ आणि कियारा बॉलीवूडच्या चकाचकांपासून दूर खाजगी पद्धतीने लग्न करणार आहेत.
आधी हे दोघं रजिस्टर मॅरिज करतील. यानंतर कॉकटेल पार्टी आणि रिसेप्शन होईल.
सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नाला फक्त कुटुंबातील सदस्य आणि काही जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत.
कियारा आणि सिद्धार्थ यांची पहिली भेट 2018 मध्ये लस्ट स्टोरीज चित्रपटाच्या रॅप अप पार्टीमध्ये झाली होती.

Edited by: Rupali Barve