शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 12 ऑक्टोबर 2022 (14:52 IST)

‘तारक मेहता….’ फेम दिशा वाकानीला कॅन्सर? चाहते प्रचंड चिंतेत

dayaben
तारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिशा वकानी या अभिनेत्रीबद्दल धक्कादायक बातमी समोर येत आहे. मालिकेमध्ये दिशाने दया भाभीची भूमिका केली आहे. जी अतिशय लोकप्रिय ठरली आहे. गेल्या काही वर्षांपासून ती मालिकेमध्ये नाही. मात्र, आता दिशाला घशाचा कर्करोग झाल्याचे वृत्त आहे. त्याचे कारण शोमधील तिचा विचित्र आवाज हे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत दिशाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. घशात काही समस्या आल्‍यानंतर तिला घशाचा कॅन्‍सर असल्‍याचे वृत्त आहे. या शोमध्ये नट्टू काकांची भूमिका साकारणारे घनश्याम नायक यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी घशाच्या कर्करोगाने निधन झाले आहे.
 
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमधील दया बेन ही लोकांची आवडती व्यक्तिरेखा आहे. दिशा वाकाणीने या भूमिकेतून चाहत्यांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले आहे. ती काही वर्षांपासून शोमधून गायब आहे. ती लवकरच परतेल, अशी चाहत्यांना आशा आहे. मात्र, निर्माता असित मोदींनी सांगितले की, दिशाऐवजी कोणीतरी दया बेनची भूमिका साकारणार आहे.
 
दरम्यान, दिशा वाकाणीच्या घशात काही समस्या असल्याच्या बातम्या आल्या होत्या. आता काही मीडिया रिपोर्ट्स येत आहेत की दिशाला घशाचा कर्करोग आहे, त्यामुळे ती शोमध्ये परतत नाहीये. या बातम्यांनी चाहते नाराज झाले आहेत. काही काळापूर्वी, इ टाइम्सशी केलेल्या संभाषणात, शोचे निर्माते असित मोदी यांनी सांगितले होते की, दिशाने लग्नाच्या काही काळानंतर काम केले. यानंतर ब्रेक घेतला आणि ती आई झाली. मुलाची काळजी घेण्यासाठी तिने ब्रेक सुरू ठेवला, पण शो सोडला नाही. असित म्हणाला होता की, दिशा परत येईल, अशी आम्हाला आशा होती. त्यानंतर कोरोना महामारी आली. आम्ही खबरदारी घेत होतो पण दिशा म्हणाली की ती परत येण्यास घाबरत होती.
 
Edited By- Ratandeep Ranshoor