1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 मार्च 2023 (14:07 IST)

Ishita Dutta: दृश्यम 2 फेम इशिता दत्ता होणार आई

Drishyam 2 fame Ishita Dutta is going to be a mother
आपल्या अभिनयाने लोकांच्या हृदयात वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या इशिता दत्ताबद्दल एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री प्रेग्नंट आहे. अलीकडेच एका पापाराझीने इशिताचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ विमानतळावरील आहे, जिथे ती कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
ही क्लिप समोर येताच तिच्या चाहत्यांनी अभिनेत्रीचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली. एका युजरने कमेंट केली, “अभिनंदन.” दुसर्‍या युजरने लिहिले, “व्वा ती खूप सुंदर दिसत आहे. याशिवाय अनेक यूजर्स कमेंट बॉक्समध्ये अभिनेत्रीचे अभिनंदन करताना दिसले. व्वा खूप गोंडस दिसत आहे
 
तिच्या बरोबर तिचा पती वत्सल सेठ देखील अभिनेता आहे. तो अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये दिसला आहे. अब्बास-मस्तानच्या टार्झन द वंडर कारमधून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. दोघांनी 2017 मध्ये लग्न केले होते.
वर्क फ्रंटवर, इशिता शेवटची अजय देवगणच्या 'दृश्यम 2' मध्ये दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त व्यवसाय केला. बंपर कलेक्शनमुळे हा चित्रपट ब्लॉकबस्टर घोषित करण्यात आला.
 
 
Edited By - Priya Dixit