बुधवार, 31 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 11 फेब्रुवारी 2017 (12:27 IST)

मी आयटम साँगमध्येच खूश

malaika arora
अभिनेत्री मलायका अरोरा 'मुन्नी बदनाम हुई', 'छैय्या, छैय्या' यासारख्या आयटम साँगमुळे बरीच लोकप्रिय झाली. त्यामुळेच आजही तिचा ओढा आयटम साँगकडेच असल्याचं तिचं म्हणणं आहे. मलायकाच्या मते आपण सिनेमातील मोठ्या व मुख्य भूमिका साकारु शकत नाही. त्यामुळे आपण आयटम साँग करण्यातच खूश आहोत, असं तिचं मत आहे. कौटुंबिक जबाबदारीमुळे मोठ्या पडद्यापासून दूर राहणं पसंत करतेस का? याबाबत बोलताना मलायका म्हणाली की, "असं अजिबात नाही. मोठ्या पडद्याकडे माझा कधीच फार ओढा नव्हता. पण मला मोठ्या पडद्यावर फ़क्त आयटम साँग करणं आवडतं. भी संपूर्ण सिनेमात काम करणं हे मला पटत नाही' दरम्यान, मलायका नुकतीच लॅक्मे फैशन वीकमध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी मलायका म्हणाली की, 'मी एक आई आहे आणि माझ्यावर मुलाची जबाबदारी आहे म्हणून मी मोठ्या पडद्यापासून दूर  राहतें. असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे.' मोठ्या पडद्यापेक्षा तू छोट्या पडद्याला पसंती देतेस, त्याचं नेमकं कारण काय? याबाबत मलायका म्हणाली की, 'टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही घरा-घरात पोहोचता. तुम्ही लोकांशी जोडले जाता. त्यामुळेच मी छोट्या पडद्याला पसंती दिली. तर मोठ्या पडद्यावरील सिनेमे पाहण्यासाठी तुम्हाला घरातून बाहेर पडावं लागतं." सध्या मलायका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चेहरा आहे. टीव्ही शो "नच बलिए', जरा नचके दिखा', "झलक दिखला जा' आणि "इंडियाज गोट टेलेंट' या शोमध्ये ती दिसून आली होती.