गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

आता रिमेक 'जब वी मेट' चा

'जब वी मेट' प्रदर्शित होऊन दहा वर्ष लोटली असली तरी अद्यापही चाहत्यांना या चित्रपटाचं आकर्षण आहे. शाहिद आणि करिनाने साकारलेल्या व्यक्तिरेखा लोकांच्या मनात ठसल्या आहेत. म्हणूनच इम्तियाझ अलीनं चित्रपटाच्या सीक्वेलचं सूतोवाच केलं आहे.
 
जब वी मेटच्या सीक्वेलमध्ये कोण असणार, याबाबतच्या चर्चाही सुरु झाल्या आहेत. सीक्वेलमध्ये काम करण्यासाठी आपण तयार असल्याचं शाहिदनं सांगितलं आहेह. त्यामुळे तो या चित्रपटात असेल. आता करिनाची व्यक्तिरेखा कोण साकारणार, याबाबत कुतूहूल आहे. करिनाच्या भूमिकेसाठी आलिया भट्ट ही योग्य निवड असू शकते, असं शाहिदला वाटतं.