शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 7 जून 2017 (11:55 IST)

आता 'जय मल्हार' मालिका हिंदीमध्ये

मराठीमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकणारी 'जय मल्हार' ही मालिका आता हिंदीमध्ये बघायला मिळणार आहे. मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. पण आता ही मालिका हिंदी भाषेत डब केली जाणार आहे. पुढच्या काही दिवसात झी हिंदी चॅनेलवर ही मालिके टेलिकास्ट होणार आहे. हिंदीत डब होणारी जय मल्हार ही पहिलीच पौराणिक मराठी मालिका असेल.  'जय मल्हार'च्या तामिळ भाषेतल्या व्हर्जनलाही उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. खंडेराय, म्हाळसा, बानू यांच्या भूमिकांना हिंदीत आवाज देण्यासाठी व्हॉइस आर्टिस्ट्स नेमण्यात आले असल्याचं कळतं आहे. दिग्दर्शक-निर्माते महेश कोठारे यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे. 'माझी ही कलाकृती पहिल्यांदाच हिंदीसाठी डब होत असल्याचा मला अभिमान वाटत असल्याचं मत महेश कोठारे यांनी व्यक्त केलं आहे.