Refresh

This website marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/jassi-jaisi-koi-nahin-fame-mona-singh-will-now-become-a-gangster-working-with-aamir-khan-124072300056_1.html is currently offline. Cloudflare's Always Online™ shows a snapshot of this web page from the Internet Archive's Wayback Machine. To check for the live version, click Refresh.

गुरूवार, 9 ऑक्टोबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 24 जुलै 2024 (00:15 IST)

जस्सी जैसी कोई नहीं' फेम मोना सिंग आता बनणार गँगस्टर,आमिर खान सह काम करणार

Jassi Jaissi Koi Nahin
जस्सी जैसी कोई नहीं' द्वारे टीव्ही स्क्रीनवर प्रत्येक घराघरात आपले खास स्थान निर्माण करणारी लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री मोना सिंगआता बॉलिवूडमध्येही अप्रतिम काम करत आहे.

मोना सिंग एकापाठोपाठ एक मोठ्या प्रॉडक्शन हाऊसच्या चित्रपटांमध्ये काम करत आहे. नुकतेच मोना सिंगने 'मुंज्या' या हॉरर कॉमेडी चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पाही पार केला आहे.
 
मोना सिंग पुन्हा अभिनेत्री आमिर खान प्रॉडक्शन निर्मित तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये काम करण्यासाठी सज्ज झाली आहे.
आमिर खान प्रॉडक्शनसह तिच्या आगामी चित्रपटासाठी तयार आहे. मिस्टर परफेक्शनिस्टसोबत ही अभिनेत्री तिसरी वेळ काम करत असून त्याबद्दल ती खूप उत्सुक आहे
 
मोनाने अलीकडेच तिचा बहुप्रतिक्षित 'हॅपी पटेल डेंजरस डिटेक्टिव्ह' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे, ज्यामध्ये ती कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे. निर्मात्यांनी सांगितले की, 'मोनाने आमिर खान प्रॉडक्शनसोबत चित्रीकरण पूर्ण केले आहे. या चित्रपटात ती एका गँगस्टरची भूमिका साकारणार आहे.
हॅपी पटेल डेंजरस डिटेक्टिव्ह' या कॉमेडी ॲडव्हेंचरमध्ये मोना सिंग एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे.
 
मोना सिंगला 'जस्सी जैसी कोई नहीं' या व्यक्तिरेखेने ओळख मिळाली. या टीव्ही शोमध्ये मोना सिंग एका प्रेक्षणीय मुलीच्या भूमिकेत दिसली होती, 
 
Edited by - Priya Dixit