सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

लाहोर 1947 चे शूटिंग पूर्ण, सनी देओल-प्रीती झिंटा पुन्हा एकत्र दिसणार

Film Lahore 1947:  गदर 2' चित्रपटाच्या यशानंतर, चाहते सनी देओलच्या पुढील चित्रपट 'लाहोर 1947' ची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात सनी देओल आणि प्रिती झिंटाची जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. आता या चित्रपटाबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे.
 
आमिर खान निर्मित आणि राजकुमार संतोषी दिग्दर्शित 'लाहोर 1947' चे शूटिंग पूर्ण झाले आहे. प्रीती झिंटाने तिच्या एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.
 
 
प्रिती झिंटाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये चित्रपटाच्या सेटवरील अनेक छायाचित्रे दिसत आहेत. शूटिंग रॅपिंगच्या सेलिब्रेशनचा हा व्हिडिओ शेअर करताना प्रिती झिंटाने एक खास कॅप्शन लिहिले आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Preity G Zinta (@realpz)

प्रीती झिंटा आणि सनी देओल याआधी फर्ज, द हीरो आणि भैय्याजीमध्ये एकत्र दिसले आहेत. आमिर खान त्याच्या बॅनरखाली निर्माता म्हणून 'लाहोर 1947' चित्रपटाची निर्मिती करणार आहे. तर दिग्दर्शक राजकुमार संतोषी या प्रकल्पाचे दिग्दर्शन करत आहेत.

Edited by - Priya Dixit