शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 25 फेब्रुवारी 2023 (10:14 IST)

पाकिस्तानमधल्या त्या वक्तव्याबद्दल जावेद अख्तर यांनी म्हटलं

Javed Akhtar
लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तान दौऱ्यामध्ये 26/11 च्या मुंबई हल्ल्यासंबंधी केलेल्या वक्तव्यावर शुक्रवारी (24 फेब्रुवारी) भाष्य केलं.
 
त्यांनी म्हटलं की, पाकिस्तानमध्ये असूनही मनात जे आहे ते बोलण्याची भीती मला वाटली नाही.
 
प्रसिद्ध शायर फैज अहमद फैज यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गेल्या आठवड्यात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात जावेद अख्तर सहभागी झाले होतो. त्यावेळी बोलताना जावेद अख्तर यांनी म्हटलं होतं की, भारत जेव्हा 2008 च्या कट्टरतावादी हल्ल्याबद्दल भाष्य करतो, तेव्हा पाकिस्ताननं नाराज नाही झालं पाहिजे.
 
एबीपी चॅनेलच्या एका कार्यक्रमादरम्यान या वक्तव्याबद्दल म्हटलं, “ही खूप मोठी गोष्ट बनली. इथे आल्यावर मला असं वाटलं की, मी तिसरं महायुद्ध जिंकलं आहे. लोकांसोबतच मीडियाचेही फोन येत होते. मला असं वाटलं की, मी एवढा काय मोठा तीर मारलाय? मला हे बोलायचंच होतं. आपण गप्प राहायचं का?”
 
एनडीटीव्हीने ही बातमी दिली आहे.

Published By -Smita Joshi