शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 4 डिसेंबर 2021 (19:04 IST)

तारक मेहता का उल्टा चष्मा मधील 'जेठालाल' लवकरच सासरे बनणार

'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा एक टीव्ही शो आहे जो गेल्या 13 वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे. या शोने त्याची स्टारकास्ट जगभरात प्रसिद्ध केली आहे. 'जेठालाल' जितके लोकांना आवडतात, तितकेच 'पोपटलाल', 'चंपक लाल', 'तारक मेहता', 'गोगी', 'टप्पू' या शोच्या इतर कलाकारांही आवडतात. या मालिकांतील जेठालाल म्हणजे दिलीप जोशी यांच्या घरात लवकरचं सनई चौघडे वाजणार आहे. दिलीप जोशी म्हणजे आपले सर्वांचे लाडके जेठालाल लवकरच सासरे बनणार आहे.   
.'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या महिन्यात दिलीप जोशी यांच्या मुलीचे नियती जोशी चे येत्या 11 डिसेंबर रोजी लग्न होणार असून जेठालाल सासरे होणार आहे .दिलीप यांचा भावी जावई एनआरआय आहे.
वृत्तानुसार, दिलीप जोशी यांची मुलगी नियती हिचे लग्न बॉलिवूडच्या एका मोठ्या लग्नापेक्षा कमी नसणार. मुंबईतील हॉटेल ताजमध्ये लग्नाची सर्व तयारी सुरू आहे. जेठालाल स्वतः आपल्या मुलीच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत. लग्नासाठी तारक मेहता का उल्टा चष्माच्या संपूर्ण टीमसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि टीव्ही स्टार्सना आमंत्रित करण्यात आले आहे.
जेठालालनेही दयाबेनला लग्नाचे निमंत्रण दिले आहे, मात्र त्या या लग्नाला येणार नसल्याचे वृत्त आहे. त्यांनी दिलीप जोशी यांचे आमंत्रण स्वीकारले, परंतु त्यांनी नम्रपणे लग्नाला उपस्थित राहण्यास नकार दिला. तथापि, त्यांनी मुलगी नियतीला खूप प्रेम आणि आशीर्वाद पाठवले आहेत.