मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 जुलै 2024 (19:43 IST)

जस्टिन बीबर अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या कॉन्सर्टमध्ये करणार परफॉर्म, घेणार एवढी फीस

Justin Bieber
Anant Radhika sangeet ceremony: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा आनंद अंबानी 12 जुलैला राधिका मर्चंटसोबत लग्न करणार आहे. दोघांच्या लग्नाचा सोहळा सुरू झाला आहे. अनंत आणि राधिकाच्या लग्नापूर्वी अंबानी कुटुंबाने दोन भव्य प्री-वेडिंग समारंभ आयोजित केले आहेत.
 
आता अनंत-राधिकाच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. काल अंबानी कुटुंबीयांनी अनंतच्या लग्नाचा शुभारंभ 'मामेरू' सोहळ्याने केला. आता या दोघांच्या संगीत सोहळ्याला अनेक सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात आंतरराष्ट्रीय पॉप गायक जस्टिन बीबरही परफॉर्म करणार आहे.
 
बेबी, सॉरी, लव्ह युवरसेल्फ यांसारख्या गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेला आंतरराष्ट्रीय पॉप गायक जस्टिन बीबर अंबानी कुटुंबाच्या लग्नात परफॉर्म करण्यासाठी लॉस एंजेलिसहून मुंबईत पोहोचला आहे. बीबर यापूर्वी 2017 मध्ये त्याच्या पहिल्या कॉन्सर्टसाठी भारतात आले होते.
 
जस्टिन बीबर शुक्रवारी स्थानिक पोलीस अधिकारी आणि त्याच्या टीमसोबत मुंबईच्या कलिना विमानतळावरून निघताना दिसले. दोन वेळा ग्रॅमी पुरस्कार विजेत्या बीबरने गुलाबी टी-शर्ट, स्वेटपँट आणि लाल टोपी घातली होती.
 
रिपोर्ट्सनुसार, जस्टिन बीबरला या परफॉर्मन्ससाठी 10 मिलियन यूएस डॉलर मानधन  दिले जात आहे. सर्वोच्च आंतरराष्ट्रीय संगीतकार ॲडेल, ड्रेक आणि लाना डेल रे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
 
Edited by - Priya Dixit