सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2023 (13:29 IST)

K. Viswanth: टॉलिवूड दिग्दर्शक के. विश्वनाथ यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन

kviswanath
K. Viswanth: टॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते के. विश्वनाथ यांचे वयाच्या 92 व्या वर्षी गुरुवारी रात्री निधन झाले. प्रदीर्घ आजारपणामुळे त्यांना काही दिवस हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 2017 मध्ये विश्वनाथ यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 
19 फेब्रुवारी 1930 रोजी आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे जन्मलेले के. विश्वनाथ यांना त्यांच्या चित्रपटांसाठी 6 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि 10 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. रात्री उशिरा त्यांचे पार्थिव ज्युबली हिल्स येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले.
k vishwanath
Twitter
43 चित्रपटांमध्ये काम केले
के. विश्वनाथ यांना चित्रपट विश्वात कला तपस्वी म्हणूनही ओळखले जात होते. त्यांनी आंध्र विद्यापीठातून विज्ञान शाखेत पदवी संपादन केली. साऊंड आर्टिस्ट म्हणून त्यांनी करिअरची सुरुवात केली. के. विश्वनाथ यांनी त्यांच्या आयुष्यात 55 चित्रपट दिग्दर्शित केले होते.
k vishwanath
Twitter
1965 च्या आत्मा गोवरवम् चित्रपटासाठी त्यांना राज्य नंदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विश्वनाथ यांनी त्यांचा शेवटचा चित्रपट सुभाप्रधाम दिग्दर्शित केला होता. त्याने आपल्या कारकिर्दीत 43 चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम केले.
के. विश्वनाथ यांच्या निधनावर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. प्रसिद्ध चित्रपट अभिनेते अनिल कपूर यांनी ट्विट करून के. विश्वनाथ जी तुम्ही मला खूप काही शिकवले आहे, ईश्वरच्या वेळी तुमच्यासोबत सेटवर असणे म्हणजे मंदिरात असल्यासारखे होते. याशिवाय सुप्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान यांनीही शोक व्यक्त केला आहे.