मंगळवार, 15 ऑक्टोबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 जून 2023 (22:30 IST)

कठीण काळातून जात आहे म्हणत काजोलने सोशल मीडियाला ठोकला रामराम!

kajol
सोशल मीडिया या माध्यमाचा वापर अनेक लोक जगासमोर व्यक्त होण्यासाठी करतात. सोशल मीडियाद्वारे अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं आता कलाकारांसाठी सोपं झालं आहे. सतत व्हिडीओ, फोटो, पोस्ट शेअर करणं कलाकारांना आवडतं. काही कलाकार मंडळी तर आपल्या खासगी आयुष्याबाबतही सोशल मीडियाद्वारे खुलेपणाने बोलताना दिसतात. पण अलिकडे सोशल मीडियापासून काही काळ ब्रेक घेणं हा नवा ट्रेंड कलाकारांमध्ये सुरु झाला आहे. आता काजोल देवगणनेही सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे
 
अभिनेत्री काजोलनं सोशल मीडिया संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. काजोल ही सोशल मीडियावरुन ब्रेक घेत आहे. काजोलनं एक पोस्ट शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे.  काजोलनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं, ‘माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्प्यातून जात आहे.’ या पोस्टला काजोलनं कॅप्शन दिलं, मी सोशल मीडियावरुन ब्रेक घेत आहे. काजोलनं इन्स्टाग्रामवरील सर्व पोस्ट डिलीट केल्या आहेत. काजोलनं सोशल मीडियावरुन ब्रेक घेण्याचा निर्णय का घेतला आहे? असा प्रश्न आता तिच्या चाहत्यांना पडला आहे.
 
काजोलनं शेअर केलेल्या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, ‘मला माहित नाही की असे काय झाले ज्यामुळे तू हा निर्णय घेतला, आम्ही तुझे चाहते आहोत आणि तुझ्या चाहत्यांचे तुझ्यावर प्रेम आहे, त्यामुळे आम्ही तुला शुभेच्छा देतो’ तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, ‘काळजी घे’
 
काजोल ही इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह होती. तिला इन्स्टाग्रामवर 14.4 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. आता काजोलनं इन्स्टाग्रामवरील सर्व फोटो डिलीट केल्यानं तिचे फॉलोवर्स कमी होतील का? असा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor