बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 19 जानेवारी 2021 (11:11 IST)

Kamal Hassan Health Bulletin: कमल हसन हॉस्पिटलमध्ये दाखल, पायाच्या हाडामध्ये झाले होते इन्फेक्शन

अभिनेता-राजकारणी कमल हसन यांना रुग्णालयात दाखल केले. त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करावी लागली, ज्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कमल हासनला उजव्या पायाच्या हाडात इन्फेक्शनची समस्या आहे. ज्याची शस्त्रक्रिया झाली आहे. यामुळे डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. यासंदर्भात रुग्णालयात दाखल कमल हसन यांचे वैद्यकीय बुलेटिनही रुग्णालयाने जारी केले आहे. 
 
कमल हासन हे श्री रामचंद्र मेडिकल सेंटरमध्ये एडमिट आहेत. इस्पितळातर्फे जारी करण्यात आलेल्या आरोग्यविषयक बुलेटिनमध्ये असे म्हटले आहे की- 'कमल हासन यांच्या पायाच्या हाडात संक्रमण झाल्याने शस्त्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर श्री रामचंद्र मेडिकल सेंटरमध्ये दाखल केले गेले होते. टिबियल हाडातील संक्रमक फोकस हटवण्यासाठी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. आता त्यांची प्रकृती स्थिर असून ते बरे होत आहे.