शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 23 डिसेंबर 2020 (10:54 IST)

मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत नव्या कोरोनाचा अभ्यास होणार

ब्रिटनमध्ये नव्या कोरोना विषाणूमुळे हाहाकार माजल्याचे समोर आले आहे. वैद्यकीय क्षेत्रात या नव्या कोरोना विषाणू संदर्भातील संशोधनासाठी प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळेत सप्टेंबर महिन्यापासून संग्रहित केलेल्या नमुन्यांचा अभ्यास करण्यात येणार आहे.
 
नव्या कोरोना विषाणूचे निदान करण्यासाठी सध्या आपल्याकडे कोणतीही विशेष चाचणी उपलब्ध नाही. पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळेच्या प्रमुख डॉ. जयंती शास्त्री यांनी सांगितले, ब्रिटनच्या नव्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आम्ही येथील प्रयोगशाळेत सप्टेंबरच्या वेगवेगळ्या कालावधीत जमा केलेल्या कोरोना पॉझिटिव्ह स्वॅबचा पुन्हा  अभ्यास होणार  आहे. त्या नमुन्यांतील एस जेन या घटकाविषयी संशोधनात्मक पातळीवर अभ्यास करून पुढील निष्कर्षासाठी पुणे येथील एनआयव्ही प्रयोगशाळेत पाठविण्यात येईल.