शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 1 एप्रिल 2020 (10:29 IST)

काय म्हणता, लिलावतीमध्ये कोरोना निष्पन्न, कस्तुरबात निगेटीव्ह

लिलावती रुग्णालयात कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झालेला तरुण कस्तुरबा रुग्णालयातील चाचणी कोरोना + असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे अहवालांबाबत काहीसे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असले तरी या रुग्णाला १४ दिवस होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
 
ठाण्यात वास्तव्याला असलेला हा तरुण परदेश प्रवास करून आला होता. सर्दी खोकला आणि ताप असल्यामुळे त्याला सुरवातीला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याची कोरोनाची टेस्ट पॉझिटीव्ह आली होती. त्यानंतर त्याला तडक कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आश्चर्यकारक पध्दतीने तिथे रिपोर्ट निगेटीव्ह आला.
 
त्यानंतर हा रुग्ण ठाण्यात आपल्या घरी परतला. ही बाब सोमवारी ठाणे पालिका मुख्यालयात झालेल्या एका बैठकीत उघड झाली. त्यावेळी दिलेल्या आदेशानंतर या तरुणाला १४ दिवस पालिकेच्या विलगिकरण कक्षात ठेवण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.