‘थप्पडकांड’ मुळे झाली चर्चा, सद्गुरुंच्या शरणमध्ये पोहचली कंगना रनौत
अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत बद्दल मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेत्री आपल्या चित्रपटापेक्षा कॉन्ट्रोवर्सी मुळे जास्त चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी चंदिगड एयरपोर्टवर CISF महिला जवानाने थप्पड मारली होती. यानंतर बॉलिवूड पासून तर सोशलमिडियावर चर्चा सुरु होती. अनेक जण कंगना ला सपोर्ट करत होते तर अनेक जण त्यांना चुकीचे बोलत होते. अश्यावेळेस पुन्हा एकदा कंगना चर्चेत आली आहे. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये यश आणि खासदार पदाची शपथ घेतल्यानंतर कंगना सद्गुरुंच्या शरणात गेली आहे.
कंगना रनौतचे जे फोटो समोर आले आहे. ते अभिनेत्रीने स्वतः इंस्टाग्राम अकाउंट वर शेयर केले आहे. कंगना सद्गुरुच्या आश्रम कोयंबटूर मध्ये पोहचली आहे.जिथून त्यांनी फोटो शेयर केले. त्यांनी फोटो शेयर करत कॅप्शनमध्ये लिहले की, “मेरी हैप्पी प्लेस” आणि ईशा फाउंडेशनला टॅग देखील केले. कंगना रनौत ने जे फोटो शेयर केले आहे.त्यामध्ये त्यांनी पांढरी बॉर्डर असलेली गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे.
Edited By- Dhanashri Naik