शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: बुधवार, 12 जून 2024 (12:02 IST)

मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आजचा 5 वा दिवस, सलाईनद्वारे उपचार सुरू

मराठा आरक्षण मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे.
 
जरांगे यांना सलाईनद्वारे उपचार देण्यास सुरुवात करण्यात आलीय. आतापर्यंत त्यांना 3 सलाईनच्या बाटल्यांद्वारे उपचार देण्यात आलेत. तर सध्या चौथ्या सलाईन द्वारे जरांगे यांना उपचार देण्यात येताय.
 
सोलापूरमधील बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी काल (11 जून) रात्री उशिरा मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोनवरून संपर्क साधला. त्यानंतर जरांगे यांनी उपचार घेण्यास सुरुवात केलीय.
 
चार दिवसांच्या कठोर आमरण उपोषणामुळे ढासळत चाललेली मनोज जरांगे पाटलांची प्रकृती आता हळूहळू सुधारत आहे.

Published By- Dhanashri Naik