बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 12 सप्टेंबर 2022 (21:35 IST)

‘ब्रह्मास्त्र’च्या कमाईचे आकडे खोटे असल्याचे कंगनाने म्हटलं

kangana ranawat
बिग बजेट ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट ९ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर, अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटालादेखील बॉयकॉट ट्रेण्डचा सामना करावा लागला. मात्र या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ३७ कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी ४२ कोटींची कमाई करत चित्रपटाने देशभरात १०० कोटींचा आकडा पार केला.
 
या चित्रपटाने आतापर्यंत भारतात १२५ कोटींची तर जगभरात २१० कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचं सगळेच जण कौतुक करत असताना कंगना रणौतने मात्र नव्या वादाला सुरुवात केली आहे. ‘ब्रह्मास्त्र’च्या कमाईचा आकडा पाहून कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. करण जोहर गँगची ही युक्ती प्रेक्षकांना आपल्या जाळ्यात अडकवण्याची असल्याचे कंगनाने सांगितले. कंगनाने स्पष्ट केले की, चित्रपटाचे कलेक्शन जेवढे सांगितले जात आहे तेवढे नाही. तसेच ‘ब्रह्मास्त्र’च्या कमाईचे आकडे खोटे असल्याचे तिने म्हटलं आहे.