शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 1 नोव्हेंबर 2023 (12:44 IST)

Kangana's movie is a superflop कंगनाचा सिनेमा सुपरफ्लॉप

कंगनाचा सिनेमा सुपरफ्लॉप
Kangana's movie is a superflop मुंबई. बॉलिवूड क्वीन कंगना राणौतचा लोकप्रिय चित्रपट तेजस 27 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कामगिरी केली. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा होती. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर जादू निर्माण करण्यात अपयशी ठरल्याचे दिसत आहे. 'तेजस'ने बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा खूपच कमी कमाई केली.
 
पहिला वीकेंड ‘तेजस’साठी खूपच निराशाजनक राहिला.  रिपोर्टनुसार, या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी केवळ 1.30 कोटींची कमाई केली आहे. 60 कोटींचे बजेट असलेला हा चित्रपट पहिल्या वीकेंडमध्ये 5 कोटींचा आकडाही पार करू शकला नाही, ही कंगनासाठी चिंतेची बाब आहे.
 
रिपोर्टनुसार, असेही बोलले जात आहे की येत्या सोमवारच्या टेस्टमध्ये हा चित्रपट नक्कीच नापास होईल. एकूणच या आकड्यांवर नजर टाकली तर चित्रपटाने सोमवारी 54 लाखांची कमाई केली आहे.
 
रिलीजच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 1.25 कोटींची कमाई केली. आकडेवारीवर नजर टाकली तर चित्रपटाने दोन दिवसांत केवळ 2.50 कोटींची कमाई केली आहे. आता तिसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडेही समोर आले आहेत आणि ते पाहता कंगनाचा 'तेजस' पहिल्या तीन दिवसात 4 कोटींचा आकडाही पार करू शकला नाही.
 
काल कंगनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करून प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याची विनंती केली आहे. यामुळे लोकांनी तिला   खूप ट्रोल केले आहे. 'धाकड' पेक्षा सरस असूनही कंगनाच्या 'तेजस'ला बॉक्स ऑफिसवर आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी निश्चितच मेहनत घ्यावी लागणार आहे.