सोमवार, 3 नोव्हेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : रविवार, 28 सप्टेंबर 2025 (10:31 IST)

कपिल शर्माला धमकी मिळाली, 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली,आरोपीला अटक

Kapil Sharma

पश्चिम बंगालमधील एका रहिवाशाने विनोदी कलाकार कपिल शर्माला गुंड रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार यांच्या नावाचा वापर करून धमकी दिली आणि त्याच्याकडून 1 कोटी रुपयांची मागणी केली. मुंबई पोलिसांनी पश्चिम बंगालमधून आरोपीला अटक केली आहे.

मुंबई गुन्हे शाखेने दिलीप चौधरीला पश्चिम बंगालच्या 24 परगणा जिल्ह्यातून अटक केली. त्याच्यावर कपिल शर्माला धमकी दिल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने विनोदी कलाकाराला धमकीचा ईमेल पाठवला आणि 1कोटी रुपयांची मागणी केली.

ईमेलमध्ये त्याने स्वतःची ओळख गोल्डी ब्रार आणि रोहित गोदरा टोळीचा सदस्य म्हणून करून दिली. आरोपी खरोखर गोल्डी ब्रार आणि रोहित गोदरा टोळीशी संबंधित आहे का याचा तपास सुरू आहे.

जुलैमध्ये कॅनडामधील कपिल शर्माच्या "कॅप्स कॅफे" वरही गोळीबार झाला होता. कॅफेवर एकदा नाही तर दोनदा गोळीबार झाला होता. गोल्डी ढिल्लन आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.

Edited By - Priya Dixit