कॉमेडियन सुगंधा मिश्रा बनली आई, पती संकेतने दाखवली रुग्णालयातून बाळाची पहिली झलक
Sugandha Mishra Baby 'द कपिल शर्मा शो' फेम कॉमेडियन सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले आई-वडील झाले आहेत. नुकतेच सुगंधाने मुलीला जन्म दिला आहे. तिचा पती संकेतने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
सुगंधा मिश्राने मुलीला जन्म दिला
गायिका, अभिनेत्री आणि कॉमेडियन सुगंधा मिश्रा हिने ऑक्टोबर महिन्यात तिच्या प्रेग्नन्सीची घोषणा केली होती. आता अभिनेत्रीने लग्नाच्या अडीच वर्षानंतर आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आहे. संकेतने सोशल मीडियावर एका गोंडस व्हिडिओद्वारे मुलीच्या जन्माची माहिती दिली.