शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 16 फेब्रुवारी 2023 (17:37 IST)

तेजस्वी-करण अडकणार लग्नबंधनात

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. या दोघांची प्रेमकहाणी बिग बॉस 15 मध्ये सुरू झाली आणि तिथून बाहेर पडल्यानंतर दोघेही एकत्र आहेत. दोघेही अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र स्पॉट झाले आहेत. कधी ते हात धरुन दिसतात तर कधी बाईकवरून फिरताना दिसतात. करण आणि तेजस्वीची क्यूट लव्हस्टोरी पाहिल्यानंतर चाहते त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत. त्याचवेळी या सेलिब्रिटींनी नुकतीच एक मुलाखत दिली, ज्यानंतर चाहते मार्चमध्ये लग्न करणार असल्याचा अंदाज लावत आहेत.
 
करण आणि तेजस्वीला चाहते प्रेमाने तेजरान म्हणतात. नुकतीच या जोडप्याने एका रेडिओ वाहिनीला मुलाखत दिली. यादरम्यान करण कुंद्रा लग्नाच्या मुद्द्यावर म्हणाला, 'मी मार्चमध्ये लग्न करण्यास तयार आहे. इतकेच नाही तर करणने हे देखील सांगितले की त्याचे कुटुंबीय देखील लग्नासाठी तयार आहेत, परंतु कामाच्या कमिटमेंटची समस्या आहे. त्याने सांगितले की, तेजस्वीने बिग बॉस संपल्यानंतर नागिनला साइन केले होते. आता नागिन संपतच नाहीये.
 
करण पुढे गमतीने म्हणाला, 'एवढा यशस्वी सीझन देण्याची काय गरज होती'. यानंतर करण तेजस्वीला लग्नाबद्दल विचारतो, तुला वेळ कधी आहे. यानंतर जेव्हा करणला विचारण्यात आले की, त्याला डेस्टिनेशन वेडिंग करायचे आहे का? यावर करण म्हणाला, "कुठेही झाल्यास चालेल, मी तर फिल्म सिटी मध्ये देखील करण्यास तयार आहे"
यानंतर जेव्हा त्याला विचारण्यात आले की लग्नाच्या प्रश्नावर तो नाराज होत नाही का? यावर तो म्हणाला, मला वाटत नाही की या प्रश्नाने मला कधीच त्रास होईल. इतकी सुंदर अनुभूती आहे. ते पुढे म्हणाले की, आमच्या प्रेमकथेशी अनेक लोक जोडले गेले आहेत.