शुक्रवार, 5 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 13 डिसेंबर 2021 (20:58 IST)

करीना कपूर खानला कोरोनाची लागण, बीएमसी ने करीना कपूर खानचे घर सील केले

Kareena Kapoor Khan infected with corona
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानला कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) करिनाचे घर सील केले आहे. बीएमसीकडून सांगण्यात आले आहे की, आतापर्यंत करिनाकडून संपूर्ण माहिती मिळालेली नाही, मात्र अभिनेत्री कोणाच्या संपर्कात आली याची बीएमसी चौकशी करत आहे. करिनासोबतच अमृता अरोरा हिलाही कोरोनाची लागण लागली आहे. दरम्यान, करीना कपूरने इन्स्टास्टोरी शेअर केली आहे.
करीना कपूर खानने अलीकडेच इन्स्टा स्टोरीवर एक नोट शेअर केली आहे. तिच्या स्टोरीवर करिनाने लिहिले की, 'मला कोविडची लागण लागली आहे. मी स्वतःला आयसोलेट केले आहे आणि सर्व वैद्यकीय प्रोटोकॉलचे पालन करत आहे. जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत, मी त्या सर्वांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या चाचण्या करून घ्याव्यात. माझे कुटुंब आणि माझे कर्मचारी यांचे दुहेरी लसीकरण झाले आहेत आणि कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. मी पण ठीक आहे आणि लवकरच परत येईन.
सूत्रांनी सांगितले की, शनिवारी त्यांची तपासणी करण्यात आली. काल, करीना कपूर खान यांना कोविडची लागण झाल्याची पुष्टी झाली. सध्या त्या होम क्वारंटाईनमध्ये आहेत.