सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 जानेवारी 2021 (18:22 IST)

करीनाने केला बेबीबंपसोबत योग, फोटो व्हायरल

अभिनेत्री करीना कपूर खानचा प्रेग्नंसी काळ सुरु असून ‍ती लवकरच दुसर्‍यांदा आई होणार आहे. दरम्यान ती आपल्या फिटनेसकडे लक्ष देत असून तिचे अनेकदा स्टाइलिश फोटो व्हायरल होत असतात. अलिकडेच करीनाने इन्स्टाग्रामवर तिचे योग करतानाचे फोटो शेअर केले आहे. 
 
करीनाचे बेबी बंपसोबत योग करतानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायल होत आहे. तिने शेअर केलेल्या दोन पोस्टपैकी एकात ती काळ्या रंगाच्या तर दुसर्‍यात गुलाबी रंगाच्या कपड्यांत दिसत आहे. Current Mood: Stretched to the max! असं कॅप्शन देत तिने पोस्ट केली आहे. तर दुसर्‍या पोस्टमध्ये A little bit of yoga. A little bit of calm. असं कॅप्शन तिने दिले आहे.
 
करीना गरोदरपणातील अनुभव ‘प्रेग्नंसी बायबल’ या पुस्तकात लिहित आहे.