मंगळवार, 30 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 14 डिसेंबर 2016 (12:15 IST)

घटस्फोटानंतर लिव्ह-इनमध्ये राहण्याच्या तयारीत करिश्मा कपूर

karishma kapoor
बॉलीवूड एक्ट्रेस करिश्मा कपूर आजकाल आपल्या चित्रपटांमुळे नव्हेतर आपल्या लव्हलाइफमुळे जास्त चर्चेत आहे. वृत्तानुसार, करिश्मा तिचा ब्वॉयफ्रेंड संदीप तोशनीवालसोबत लिव्ह-इनमध्ये राहण्याची तयारी करत आहे.  
 
संजय कपूरशी घटस्फोट नंतर आता असे वृत्त आहे की करिश्मा मुंबई बेस्ड सीईओ संदीप तोशनीवालला डेट करत आहे आणि त्याच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहणार आहे, ते ही मुलं समायरा आणि कियानसोबत.  
 
सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार संदीप बांद्रा भागात घराचा शोध घेत आहे. महत्त्वाचे म्हणजे संदीप देखील विवाहित आहे आणि बायको अर्शिताशी घटस्फोट घेणार आहे. त्याने कोर्टात अर्जी दिली आहे. तसेच अर्शिताने नवर्‍यावर धोका देण्याचा आरोप लावला आहे. अर्शिताचे म्हणणे आहे की संदीप तोषनीवाल करिश्मा कपूरसाठी तिला धोका देत आहे.  
 
करिश्मा आणि संदीप पहिल्यांदा एका कॉमन फ़्रेंडच्या माध्यमाने भेटले होते. तेव्हापासून दोघांमध्ये भेटी गाठी सुरूच आहे. दोघांना बर्‍याच वेळा सोबत सोबत बघितले आहे. करीना कपूरचे चित्रपट 'की एंड का'च्या ठेवण्यात आलेल्या पार्टीत देखील करिश्मा आणि संदीप तोषनीवाल सोबत दिसले होते.  
 
सध्या करिश्मा कपूर घटस्फोटानंतर मुलांसोबत वडील रणधीर कपूर सोबत राहत आहे.