मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 16 जून 2018 (12:48 IST)

करिश्माला करायचाय माधुरीचा बायोपीक

अभिनेत्री करिश्मा तन्ना सध्या खूप खूश आहे. तिच्या खुशीचे कारणही तितकेच खास आहे. एकीकडे ती छोट्या पडावरील सर्वात चर्चित शो नागिन-3 करत आहे, तर दुसरीकडे वर्षातील सर्वात मोठा चित्रपट मानला जाणार्‍या संजूमध्ये देखील ती एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. संजूमध्ये काम करण्याचा अनुभव कसा होता? अशी विचारणा करिश्माला करण्यात आली असता ती म्हणाली, चित्रपटामध्ये रणबीर कपूर सोडून सोनम, अनुष्का, मनीषा कोईराला, दिया मिर्झा या सर्वांचे छोटे रोल आहेत, परंतु सर्वांनी यामध्ये काम केले. कारण हा खूप सुंदर चित्रपट आहे. त्यातच राजू सरांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. रणबीर, विकी व राजू सर अशा तिघांबरोबर काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता.  मी राजू सरांच्या दिग्दर्शनाची खूप प्रशंसा ऐकली होती. त्यामुळे मला त्यांचे दिग्दर्शन पाहायचे होते. त्यांच्याकडून शिकायचे होते. रणबीर व विकी खूप मस्तीखोर आहेत. त्यामुळे मला खूप मजा आली. करिश्माला जेव्हा, तू चित्रपटामध्ये माधुरी दीक्षितची भूमिका करणार होतीस? अशी विचारणा केली तेव्हा ती हसत म्हणाली, नाही, परंतु आगामी चित्रपटामध्ये मला माधुरी दीक्षितची भूमिका करायला आवडेल, किंबहुना मला माधुरी दीक्षितचा बायोपिक करायचा आहे, तर नागिनमध्ये काम करण्याचे कारण सांगताना, सर्वात आधी तर एकता मॅम होत्या. दुसरे कारण म्हणजे हा शो खूप मोठा आहे. तिसरे कारण म्हणजे ही भूमिका खूप महत्त्वपूर्ण व आव्हानात्मक आहे. कारण या व्यक्तिरेखेत खूप सार्‍या भावना एकत्र आहेत, असे करिश्मा म्हणाली.