बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : गुरूवार, 14 जून 2018 (12:50 IST)

शाहरुख खानसोबत काम करण्यास कोणतीही ए-लिस्ट एक्ट्रेस तयार नाही

एकीकडे जेथे बॉलीवूडमध्ये लागोपाठ महिला केंद्रित चित्रपट तयार होत आहे, तसेच दुसरीकडे एक मोठे चित्रपट असे ही आहे ज्यात एकही महिला अॅक्ट्रेस मिळत नाही आहे. ही गोष्ट आहे शाहरुख खानच्या 'सॅल्यूट' चित्रपटाची. अंतरीक्ष यात्री राकेश शर्माची बायोपिक 'सॅल्यूट'मध्ये महिला किरदार साकारण्यासाठी एकही अॅक्ट्रेस मिळत नाही आहे.
 
राकेश शर्माच्या या बायोपिकमध्ये त्याच्या बायकोची भूमिका निभावण्यासाठी कोणीही तयार नाही आहे. चित्रपटात राकेश शर्माची भूमिका सुपरस्टार शाहरुख खान करत आहे. अॅक्टरसोबत काम करण्यास कोणतीही अॅक्ट्रेस तयार होते, पण आश्चर्यच बाब अशी आहे की कोणतीही मोठी हिरॉईन यासाठी तयार होत नाही आहे.
 
आता असे ऐकण्यात आले आहे की चित्रपटामधून फीमेल लीडचा पार्ट हटवण्यात येणार आहे किंवा एखादी नवीन हिरॉईन घेण्याची इच्छा देखील दर्शवण्यात येत आहे.
 
राकेश शर्माच्या बायोपिकमध्ये या अगोदर आमिर खान लीड रोल करत होता. पण तो आपल्या नवीन प्रोजेक्टमध्ये वेळ लावत असल्यामुळे   शाहरुख खानला यासाठी तयार करण्यात आले. शाहरुख चित्रपट 'जीरो' नंतर लगेचच 'सॅल्यूट'वर काम करेल. वृत्त असे आहे की चित्रपटात लीड रोल निभवण्यासाठी आधी प्रियंका चोप्रा आणि करीना कपूर खानला देखील अप्रोच करण्यात आले होते पण दोघांना जाणवलं की त्यांची भूमिका मेल लीडमुळे फिकी पडेल.