सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

सोशल मीडियावर व्हायरल प्रणव यांचा फेक फोटो, मुलगी म्हणे ज्याची भीती होती तेच घडले

माजी राष्ट्राध्यक्ष प्रणव मुखर्जी यांची पुत्री आणि काँग्रेस नेता शमिष्ठा मुखर्जी यांनी म्हटले की ज्या गोष्टीची भीती होती आणि आपल्या वडिलांना ज्या गोष्टीसाठी सतर्क केले होते तेच घडले. त्यांनी भाजप/आरएसएस च्या 'डर्टी ट्रिक्स डिपार्टमेंट' वर आरोप केला.
 
त्यांनी म्हटले की सोशल मीडियावर एडिट केलेल्या फोटोत असे दिसून येत आहे की माजी राष्ट्राध्यक्ष संघ नेते आणि कार्यकर्त्यांप्रमाणे अभिवादन करत आहे.
 
उल्लेखनीय आहे की सोशल मीडियावर प्रणव मुखर्जी यांची एक फोटो व्हायरल झाली आहे ज्यात त्यांच्या डोक्यावर टोपी असून ते एका स्वयंसेवकाप्रमाणे प्रार्थना करताना दिसत आहे. जेव्हाकी या कार्यक्रमात त्यांनी संघाची टोपी घातलीच नव्हती आणि प्रार्थना करताना ते सावधान मुद्रेत उभे होते.
 
प्रणव यांच्या या खोट्या फोटोमुळे सोशल मीडियावर हंगामा सुरू आहे. अनेक लोकांनी या लज्जास्पद कृत्याचा निषेध केला आणि खरा फोटो शेअर करून वास्तविकता दाखवली.
 
शर्मिष्ठा मुखर्जी यांनी त्यांना आरएसएस च्या कार्यक्रमात जाण्यास विरोध केला होता आणि ट्विटरवर आपल्या पोस्टामध्ये नाखुष असल्याचे सांगितले होते.