सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 11 नोव्हेंबर 2017 (10:42 IST)

आमदार जयंत पाटीलांनी शाहरुखला सुनावले

अभिनेता शाहरुख खानला शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी त्याच्याच चाहत्यांसमोर खडे बोल सुनावल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

यामध्ये ३ नोव्हेंबरला शाहरुख अलिबागमधल्या फार्म हाऊसवर वाढदिवस साजरा करुन परत येत होता. अलिबागहून जेव्हा शाहरुख आपल्या बोटीनं गेट वे इथं आला.  त्यावेळी त्याच्या चाहत्यांनी गेट वेवरच मोठी गर्दी केली होती. याचवेळी आमदार जयंत पाटील यांची बोट मुंबईहून अलिबागच्या दिशेनं  निघाली होती. मात्र, शाहरुख खानची बोट पार्क होईपर्यंत जयंत पाटलांना वाट पाहावी लागली. यामुळे जयंत पाटलांचा पारा चांगलाच चढला.

‘असशील तू कोणीही मोठा स्टार, पण संपूर्ण अलिबाग काय तुम्ही खरेदी केलं का?, माझ्या परवानगीशिवाय तू येऊ शकत नाही अलिबागला.’ अशा शब्दात त्यांनी शाहरुखला सुनावलं.