मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 11 नोव्हेंबर 2017 (10:35 IST)

१८ तारखेला सरकार आणीबाणीचा प्रयोग करणार :मनसे

माझी ठाण्यात १८ तारखेला सभा आहे. मात्र ही सभा कशी लोकांपर्यंत पोहोचणार नाही. याची पुरेपूर तयार केली आहे. या दिवशी येथे आणीबाणीचा प्रयोग सरकार करणार आहे. या परिसरात अचानक लोडशेडिंग होणार असून केबल कलेक्शन बंद होती. असा भाजप सरकार पुरस्कृत लाेडशेडींग घडवून ती सभा लाेकापर्यंत जाणार नाही याचा प्रयत्न सुरू असल्याचा अाराेप मनसे अध्यक्ष ठाकरे यांनी केला आहे. मात्र सभा दडपली म्हणून मिडिया थोडी थांबवता येणार आहे.  मिडियावरून विविध लिंक्सद्वारे त्याचा प्रसार करता येणार नाही का? असा सवाल त्यांनी केला.

सरकारच मुर्ख असल्यामुळे असा विचार त्यांच्या लक्षातही येणार नाही अशी खिल्लीही त्यांनी उडवली. फक्त थापा मारून सरकारं चालत नाहीत असा हल्लाबोलही त्यांनी केला.