शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017 (17:03 IST)

डीएस कुलकर्णीं यांच्या मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात

बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णींना मुंबई उच्च न्यायालयाने एका आठवड्याचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर  दुसरीकडे बँकांनी त्यांच्याविरोधात कारवाई सुरु केली आहे.
 
डीएसकेंवर अनेक बँकांचं मिळून तब्बल चौदाशे कोटींचं कर्ज आहे. त्यासाठी त्यांनी मालमत्ता गहाण ठेवल्या आहेत. याच मालमत्ता आता जप्त करण्यास सुरुवात झाली आहे. बालेवाडी आणि फुरसुंगीमधील जमीन सेंट्रल बँक ऑफ इंडियानं जप्त केली आहे. फुरसुंगीमधील जमीन ही डीएसकेंच्या बहुचर्चीत ड्रीम सीटीचा भाग आहे.
 
सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून डीएसके आणि त्यांच्या पत्नीनं 82 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. ते परत करणं डीएसकेंना जमलं नाही. त्यामुळे मालमत्ता जप्ती सुरु झाली आहे. गुंतवणूकदारांचे सहाशे कोटी रुपये आपण मालमत्ता विकून देऊ असं डीएसकेंनी वकिलामार्फत न्यायालयात सांगितलं आहे.