बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

शाहरुखला अक्षय कुमारमुळे जोर का झटका

शाहरुख खानच्या सॅल्युट मध्ये करिना कपूरची निवड फायनल झाली आणि या सिनेमाचे शूटिंग ऑगस्ट महिन्यात सुरु होणार होते. मात्र आता हे शूटिठग ऑगस्टऐवजी नोव्हेंबरमध्ये सुरु होण्याची शक्यता आहे. शाहरुखला करिना जोर का झटका देऊ शकेल, असे वाटायला लागले आहे.
 
कारण सॅल्युटमध्ये करिना शाहरुखच्या पत्नीच्या रुपात दिसणार आहे. तर दुसरीकडे करण जोहरच्या पुढच्या सिनेमामध्ये ती अक्षय कुमारची पत्नी असण्याची शक्तया आहे. तैमूर लहान असल्याने तिने इतक्यात सिनेमात पुन्हा काम करण्यास नकार दिला होता. मात्र आता वर्षाला एकच सिनेमा करण्याचे तिने ठरवले आहे. त्यामुळे तिने सॅल्युट मध्ये शाहरुखची पत्नी बनण्याऐवजी करणच्या सिनेमात अक्षयची पत्नी बनण्याचा पर्याय स्वीकारल्याची चर्चा आहे.
 
एकतर करिना दोन्ही सिनेमे करेल किंवा शाहरुखच्या सिनेमाला नकार देईल. तसे केले तर शाहरुखला दुसरी नायिका शोधावी लागेल. तिने केलेल्या ब्लॉकबस्टर सिनेमांपेक्षा तिने नाकरलेल्या आणि नंतर हिट झालेल्या सिनेमांची यादीही मोठी आहे. तिने कहो ना प्यार है, बाजीराव मस्तानी, हम दिल दे चुके सनम, रामलीला, पेज 3, चेन्नई एक्सपैस, ब्लॅक, क्वीन आणि अनेक सिनेमे नाकारले आहेत.