शुक्रवार, 1 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

करिना साकारणार आईची भूमिका

kareena kapoor

अभिनेत्री करिना कपूर आता रिल लाईफमध्ये आई होणार आहे. आगामी चित्रपटात करिना लवकरच आईची भूमिका करणार आहे. करण जोहर या सिनेमाची निर्मिती करणार आहे. करणला या भूमिकेसाठी करिनाच हवी होती. तैमूरच्या जन्मानंतर त्याने तातडीने या भूमिकेसाठी करिनाला विचारणा केली होती. मात्र त्यावेळी तैमुरच्या संगोपणाचे कारण देत करिनाने ही भूमिका नाकारली होती. या चित्रपटाची कथा लग्न आणि नातेसंबंधावर आधारित आहे, अशी माहिती मिळतेय. या चित्रपटाचे नाव तसेच त्यामधील मुख्य कलाकारांचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र येत्या नोव्हेंबरच्या महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘धडक’ चित्रपटाचे दिग्दर्शक शशांक खेतान यांचे साह्यय्यक राज मेहता हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.