मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 30 मे 2018 (09:43 IST)

कालाचा ट्रेलर रिलीज

सुपरस्टार रजनीकांत यांच्या काला सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या तमिळ सिनेमाला तेलुगू आणि हिंदीमध्येही रिलीज करण्यात येणार आहे. या सिनेमाचा आज हिंदी ट्रेलर रिलीज करण्यात आला, ज्यामध्ये नाना पाटेकर यांचीही मुख्य भूमिका दिसत आहे. रजनीकांत भ्रष्टाचाराविरोधात लढा देत असल्याचं ट्रेलरमधून दिसत आहे, तर नाना पाटेकर एका मोठ्या राजकीय नेत्याच्या भूमिकेत आहेत.

काला म्हणजेच रजनीकांत आणि नाना पाटेकर या सिनेमात आमनेसामने आहेत. धारावीला वाचवण्यासाठी काला लढत आहे. सिनेमाची निर्मिती धनुषने केली आहे, तर दिग्दर्शनाची धुरा पा. रंजित यांनी सांभाळली आहे. 7 जून रोजी देशभरात हा सिनेमा रिलीज होईल.