बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 29 मे 2018 (12:58 IST)

सोनाक्षी फिटनेससाठी करत नाही तडजोड

जेव्हा फिटनेसची आवश्यकता असते, असे आपण म्हणतो, तेव्हा कोणतीही तडजोड आपण करीत नाही. आपल्या स्वतःला सर्वश्रेष्ठ करायचे असेल तर शरीर चांगले असणे व त्यासाठी आरोग्यपूर्ण राहाणे गरजेचे असते, असे मत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने व्यक्त केले. 
 
आपल्या मर्यादांवर मात करून पुढे जाणे व दररोज आपल्याकडून जे काही आहे ते सर्वोत्कृष्ट देण्यासाठी आगेकूच करणे आवश्यक आहे. मी पूर्वी असे कधी केले नव्हते. मात्र आता मी केवळ सर्वोत्कृष्ट व अधिक सर्वोत्कृष्टच असे काम करू इच्छिते. स्वतःलाच आव्हान देत आपण हे काम करू शकतो. यामध्ये खाण्या-पिण्यापासून ते व्यायामापर्यंत सर्व काही समाविष्ट आहे, असेही तिने सांगितले. कठोर मेहनत व समर्पण हेच आपल्या यशामध्ये कामाला येते. यामध्ये कोणताही शॉर्टकट नाही, असे तिने सांगितले. 'हॅप्पी भाग जायेगी' या सीक्वलमध्ये आता सोनाक्षीला पाहता येणार आहे. आनंद एल. राय या चित्रपटाचे निर्माते असून यात डायना पेंटी व जिम्मी शेरगिल हे कलाकारही आहेत. मुदस्सर अझीझ यांच्या दिग्दर्शनाखाली तयार केला जात असलेला हा चित्रपट 24 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.