शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 29 मे 2018 (09:26 IST)

‘राझी’ १०० कोटींच्या क्लबमध्ये दाखल

आलिया भट्ट आणि विकी कौशल स्टारर ‘राझी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींची कमाई केली आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला आहे. रिलीजनंतर तिसऱ्याच दिवशी राझीने बॉक्स ऑफिसवर बदबा बनविला होता. जंगली पिक्चर्स आणि धर्मा प्रॉडक्शनच्या या चित्रपटाने गेल्या शुक्रवारीच तब्बल अडीच कोटींची कमाई केली होती आणि शनिवारी ८९ टक्के वाढीसोबत ४.२० कोटी रुपये कमावले होते. १७ व्या दिवशी म्हणजेच रविवारी चित्रपटाने चांगली कमाई केली. अशा रीतीने तिसऱ्याच आठवडय़ात एकूण १०.८७ कोटींचा बिझनेस करीत ‘राझी’ १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला.