बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 28 मे 2018 (14:56 IST)

अभिनेता अर्जुन रामपालचा २० वर्षांचा संसार मोडला

अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची पत्नी मेहेर जेसिया यांनी आपल्या २० वर्षांचा संसार मोडला आहे. आपल्या घटस्फोटाविषयी त्या दोघांनीही माध्यमांना सविस्तर माहिती दिली आहे. ‘आमच्या दोघांतील २० वर्षांच्या लग्नप्रवासाच्या खूप आठवणी आहेतच. पण आता आम्ही दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. इथून पुढं वेगळ राहून आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात करायची आहे. पण, आमच्या मनात ऐकमेकांबद्दल प्रेम व आदर नेहमीच असेल. हे सगळं विचित्र जरी असलं तरीही आयुष्य हे असचं असतं’, असं अर्जुन आणि मेहेर यांचं म्हणणं आहे.

अर्जुन आणि मेहेर यांनी वेगळ राहायचं ठरवलं तरीही ते मुलांसाठी एकत्र येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. या विषयावर अधिक काही न बोलणं इष्ट असून आम्हाला दिलेल्या सहकार्याबद्दल आम्ही आभारी आहोत, असंही त्यांनी म्हटलं आहे.