बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: बुधवार, 28 मार्च 2018 (16:43 IST)

अॅपलचा खास विद्यार्थ्यांसाठी आयपॅड

अॅपलने 9.7 इंचीचा स्वस्त आयपॅड लाँच केला आहे. हा आयपॅड विशेषत: विद्यार्थ्यांसाठी लाँच करण्यात आला आहे. भारतात हा आयपॅड एप्रिल महिन्यात उपलब्ध होणार आहे. 9.7 इंचीच्या या आयपॅडची 32 जीबी मॉडेलची किंमत 329 डॉलर (जवळजवळ 21,500 रुपये) आहे. तर विद्यार्थ्यांसाठी हा आयपॅड 299 डॉलर (19,000 रुपये) किंमतीत उपलब्ध असणार आहे. याच्या वाय-फाय आणि सेल्युलर मॉडेलची किंमत 459 डॉलर ( 29,763 रुपये) आहे. भारतात 32 जीबी वाय-फाय आणि सेल्युलर मॉडेलची किंमत 38,600 रुपये आहे.
 
अॅपलच्या 9.7 इंचीच्या आयपॅडमध्ये A10फ्यूजन चिप देण्यात आली आहे. हीच चिप अॅपलच्या आयफोन 7 मध्येही देण्यात आली आहे. आयपॅडच्या फ्रंटवर टच आयडी देण्यात आला आहे. तसंच यामध्ये 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेराही देण्यात आला आहे. A10फ्यूजन प्रोसेसर चिप असलेल्या या आयपॅडची बॅटरी 10 तासापर्यंत बॅकअप देत असल्याचा दावा अॅपलने केला आहे.