रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

मेघाने घेतले मोटारसायकल चालविण्याचे धडे

आपल्या मालिकेतील आपली भूमिका अधिकाधिक वास्तवदर्शी रंगविण्यासाठी बरेचसे कलाकार अलीकडे पटकथेच्या गरजेनुसार घोडेस्वारी, तलवारबाजी ते मोटारसायकल चालविणे यांसारख्या नवनव्या कला शिकत असल्याचे दिसतात. अशीच एक घटना स्टार प्लसवरील कृष्णा चली लंडन मालिकेबाबतही घडली. या मालिकेत कृष्णा ही व्यक्तिरेखा रंगवणारी अभिनेत्री मेघा चक्रबोर्ती हिने मालिकेत एक प्रसंग साकारण्यासाठी मोटारसायकल शिकण्याचा यशस्वी प्रयत्न केला. संबंधित प्रसंग वास्तवदर्शी होण्यासाठी निर्मात्यांनी सारी सिद्धता केली होती. त्यामुळे त्यात मोटारसायकल चालविणे हे मेघासाठी क्रमप्राप्त होते. तेव्हा मेघाने आधी काही दिवस मोटारसायकल चालविण्याचे प्रशिक्षण घेतले व त्याचा सराव केला. या अनुभवाविषयी मेघा म्हणाली, मला दुचाकी वाहनांची प्रथमपासूनच भीती वाटत होती, पण मी जेव्हा अनेक मुलींना दुचाकी चालविताना पाहते, तेव्हा मलाही आपण दुचाकी चालवावी अशी प्रेरणा मिळते. मोटारसायकल चालविण्यास शिकताना मी त्यावरून पडेन व मला दुखापत होईल अशी मला भीती वाटत होती. पण मला माझा स्वाभिमान जाणवल्याने मी आठ दिवसांत मोटारसायकल चालवायला शिकले. मला निर्मात्यांनी हा अनुभव घेऊ दिला, याबद्दल मी त्यांची आभारी आहे. कारण मोटारसायकल शिकताना मी त्याचा मनापासून आनंद घेतला.