शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 9 नोव्हेंबर 2022 (23:38 IST)

Karthik Aryan : अभिनेता कार्तिक आर्यन पुन्हा प्रेमात !

Karthik Aryan Dating Pashmina Roshan: कार्तिक आर्यनने बॉलीवूडमध्ये कोणत्याही गॉड फादर शिवाय स्वतःसाठी एक स्थान निर्माण केले आहे. अभिनय आणि लूकने चाहत्यांना घायाळ करणाऱ्या कार्तिक आर्यनचे नाव आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. सारा अली खान आणि कार्तिकच्या मैत्रीच्या बातम्या येत होत्या. आता कार्तिकचे नाव पुन्हा एका एकदा बॉलिवूडचा टॉप अभिनेता हृतिक रोशनचे काका संगीत दिग्दर्शक राजेश रोशन यांची मुलगी पश्मिना रोशनसोबत जोडले जात आहे.त्यांना दोघांना अनेकदा स्पॉट करण्यात आले .ते एकमेकांच्या घरी देखील जातात. अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 

दिवाळीच्या दिवशी, कार्तिक त्याच्या नवीन मॅकलरेन वाहनात पश्मीनासोबत जुहूमध्ये दिसला होता. आता दोघांमध्ये मैत्री आहे की त्याहून अधिक, हे स्टार्सची प्रतिक्रिया आल्यावर कळेल. पश्मिना रोशनबद्दल बोलायचे झाले तर हृतिक रोशनची बहीण पश्मीना लवकरच 'इश्क विश्क' या चित्रपटाचा सिक्वेल असलेल्या 'इश्क विश्क रिबाउंड'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पश्मिना रोशन रोहित सराफ, नायला ग्रेवाल आणि जिब्रान खानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. कार्तिक आर्यन 'फ्रेडी' या चित्रपटात दिसणार आहे, ज्याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. कार्तिक शेवटचा 'भूल भुलैया 2' या चित्रपटात कियारा अडवाणीसोबत दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कलेक्शन केले होते.
 
Edited by - Priya Dixit