रविवार, 21 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 17 जुलै 2023 (15:55 IST)

Merry Christmas Release Date Out 'मेरी ख्रिसमस' मधला कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांचा फर्स्ट लूक समोर

Merry Christmas
Merry Christmas Release Date Out: बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि साऊथ सुपरस्टार विजय सेतुपती यांचा चित्रपट 'मेरी ख्रिसमस' घोषणा झाल्यापासून चर्चेत आहे. त्याचबरोबर या चित्रपटातून दोन्ही स्टार्सचे फर्स्ट लूक पोस्टर आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
 
फर्स्ट लूक पोस्टरमध्ये कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांचा रेट्रो लूक दिसत आहे. हे पोस्टर शेअर करताना कतरिना कैफने लिहिले की, 'आम्ही ख्रिसमसच्या आनंदाची प्रतीक्षा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मेरी ख्रिसमस 15 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.
 
हा चित्रपट सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेला आहे. 'मेरी ख्रिसमस' चित्रपटाचे दिग्दर्शन जॉनी गद्दार, बदलापूर आणि अंधाधुनचे दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी केले आहे. हिंदी आणि तमिळ या दोन भाषांमध्ये वेगवेगळ्या सहकलाकारांसह चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे.
 
'मेरी ख्रिसमस'च्या हिंदी व्हर्जनमध्ये संजय कपूर, विनय पाठक, प्रतिमा कन्नन आणि टिनू आनंद दिसणार आहेत. तमिळ आवृत्तीमध्ये राधिका सरथकुमार, षणमुगराजा, केविन जय बाबू आणि राजेश विल्यम्स यांच्या भूमिका आहेत. अश्विनी काळसेकर आणि राधिका आपटे या चित्रपटात कॅमिओमध्ये दिसणार आहेत.