शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शुक्रवार, 11 जानेवारी 2019 (16:38 IST)

बॉलिवूडमध्ये लवकरच पदार्पण करणार 'खुशी कपूर'

प्रसिद्ध चित्रपट निर्माते बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूरला बॉलिवूडमध्ये पदार्पण करून दिल्यानंतर आता करण जोहर त्यांची दुसरी मुलगी खुशी कपूरला बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. बॉलिवूडमधील आघाडीचा दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरने बॉलिवूड इंजस्ट्रीजमध्ये अनेक नवीन चेहर्‍यांना पदार्पण करून दिले आहे. यात आलिया भट्‌ट, वरूण धवन, सिद्धार्थ मल्होत्रापासून जान्हवी कपूर आदी कलाकारांचा समावेश आहे. करण जोहरने म्हटले आहे की, आगामी वर्षात बोनी कपूर यांची दुसरी मुलगी खुशी कपूर आणि जावेद जाफरी यांचा मुलगा जियान हे सिनेसृष्टीत पदार्पण करू शकतात. पुढे बोलताना करणने म्हटले की, जियान हा शानदार काम करेल, तो एक प्रतिभावंत स्टार आहे आणि त्याचबरोबर तो नृत्यही उत्तम करू शकतो. तर खुशीच्या बाबतीत सांगायचे झाले तर ती एक सुंदर आणि प्रेमळ मुलगी आहे. दरम्यान, माहितीनुसार जियान याला संजय लीला भन्साळी लॉन्च करणार आहेत. भन्साळी यांनी जियान याला आपल्या आगामी चित्रपटात कास्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.