रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

प्रियांका आणणार लहानग्यांसाठी चित्रपट!

प्रियांका चोप्राने आता लहान मुलांचे मनोरंजन करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रियांका पर्पल पेबल पिक्चर्सच्या या बॅनरखाली सिक्कीम, कोकणी आणि हिंदी भाषेत लहान मुलांवर आधारित चित्रपटांची निर्मिती करणार आहे.
 
मुख्यधारेतील चित्रपटात लहान मुलांच्या चित्रपटांचा सहभाग फारच कमी असल्याने ही कमतरता दूर करण्यासाठी प्रियांका प्रयत्न करीत आहे. विशेष म्हणजे, प्रियांका चोप्राच्या निर्मितीमध्ये कथालेखक व दिग्दर्शक या महिला असतील.
 
आपल्या या नव्या उपक्रमाची माहिती देताना ती म्हणाली, आतापर्यंत लहान मुलांवर फारच कमी चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. आम्ही पीपीपीच्या माध्यामातून या क्षेत्रात पाऊल ठेवणार आहोत. लहान मुलांच्या विश्वात निरासगता, प्रेम व साधेपणा पाहायला मिळतो. या शैलीचा चित्रपट निर्माण करण्याच्या विचाराने मी उत्साहित झाली आहे. मला याचा आनंद आहे की, आम्ही लहान मुलांसाठी चित्रपटांची निर्मिती करणार आहोत.