रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 20 एप्रिल 2022 (11:09 IST)

KL Rahul and Athiya Shetty Wedding: लखनौचा कॅप्टन होणार अभिनेता सुनील शेट्टीचा जावई

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर, इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडप्याने लग्नाचा निर्णय घेतला आणि 14 एप्रिल रोजी मुंबईत आलिया-रणबीरचे लग्न झाले. 
 
रणबीर-आलियानंतर आता आणखी एक सेलिब्रिटी कपल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आणि दिग्गज क्रिकेटर केएल राहुलही लवकरच वैवाहिक  बंधनात अडकणार असल्याचे वृत्त आहे.
 
अथिया शेट्टी आणि केएल राहुलच्या घरात लग्नाची तयारी सुरू झाली आहे आणि लवकरच हे जोडपे लग्न करू शकतात. अथिया शेट्टी आणि केएल राहुल दक्षिण भारतीय पद्धतीने लग्न करणार आहेत. अहवालात अथिया शेट्टीच्या कुटुंबातील एका जवळच्या सूत्राचा हवाला देत म्हटले आहे की, शेट्टी कुटुंबात लग्नाची तयारी आधीच सुरू झाली आहे.
 
दोघांचे आई-वडील या लग्नासाठी पूर्णपणे सहमत आहेत आणि 2022 च्या अखेरीस या जोडप्याने लग्न करावे अशी दोन्ही कुटुंबांची इच्छा आहे. सुनील शेट्टीचा जन्म मुल्की, मंगळुरू येथे एका मंगळुरु तुळू भाषिक कुटुंबात झाला. तो दक्षिण भारतीय आहे आणि त्याचा भावी जावई देखील मंगळुरूचा आहे. 
 
त्यामुळेच हे लग्न पूर्णपणे दक्षिण भारतीय पद्धतीने आयोजित करण्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र, सुनील शेट्टीच्या कुटुंबीयांनी अद्याप याला दुजोरा दिलेला नाही. दोघांच्या लव्हस्टोरीबद्दल बोलायचे झाले तर अथिया शेट्टी आणि केएल राहुल एकमेकांना डेट करत आहेत. अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर दोघांच्या प्रेमकहाणीची चर्चा सुरु होती. आता लवकरच हे दोघे लग्न करणार आहे.