शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 ऑगस्ट 2022 (13:00 IST)

KWK 7कतरिना कैफ- विक्की देणार कॉफी विथ करण 7 मध्ये गोड बातमी !

अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तिच्या प्रेग्नेंसीच्या अफवांमुळे चर्चेत आहे. विमानतळावर ती बॅगी कपडे घालून दिसल्यानंतर मीडियामध्ये कतरिना गरोदर असल्याचे वादळ उठले आहे.कतरिना ही गरोदर आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहत्ये आतुरतेने वाट बघत आहे 
 
अहवालांनुसार, हे लव्ह बर्ड्स एक कुटुंब सुरू करण्याचा विचार करत आहेत आणि लवकरच करण जोहरच्या चॅट शो 'कॉफी विथ करण' वर चांगली बातमी जाहीर करतील.
 
विकी आणि कतरिनाने डिसेंबर 2021 मध्ये अचानक लग्नाची घोषणा करून संपूर्ण देशाला आश्चर्यचकित केले. 9 डिसेंबर 2021 रोजी, कतरिना आणि विकीने त्यांच्या भव्य विवाह सोहळ्याची पहिली झलक शेअर केली.
 
 सूत्रांकडून समजले की कतरिना त्यांच्या गरोदरपणाची बातमी 'कॉफी विथ करण' वर उघड करतील. सूत्राने पुढे सांगितले की, “कतरिना कैफ आणि विकी कौशल हे अतिशय खाजगी लोक आहेत आणि ते त्यांचे वैयक्तिक आयुष्य कधीच प्रसिद्धीच्या झोतात आणत नाहीत. हे जोडपे इतर सेलिब्रिटी जोडप्यांप्रमाणे त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणार नाही, परंतु लवकरच हे जोडपे चात्यांना गोड बातमी देण्याची शक्यता आहे.