सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (18:44 IST)

Bell Bottom Trailer: माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत लारा दत्तला ओळखणे कठीण आहे

अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित बेलबॉटम चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.  विमान अपहरणाच्या खऱ्या घटनांनी प्रेरित झालेल्या या चित्रपटात अक्षय व्यतिरिक्त लारा दत्ता, वाणी कपूर आणि हुमा कुरेशी मुख्य भूमिकेत आहेत. या सर्वांची पहिली झलक या रिलीज झालेल्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली आहे. प्रेक्षकांना ट्रेलर आवडला. पण ट्रेलरमध्ये लारा दत्ताच्या ट्रान्सफॉर्मेशनने लोकांना आश्चर्यचकित केले. ट्रेलरमध्ये लाराला ओळखणे कठीण झाले.
 
लाराच्या बदलेल्या लुकची चांगलीच चर्चा सुरु आहे. या सिनेमात लारा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार असून लाराचा लुक पाहून सिनेमा पाहण्याची उत्सुकता आणखी वाढली आहे. बेल बॉटमचा ट्रेलरची लाराच्या लुकमुळे सध्या जोरदार चर्चा आणि लारावर चाहत्यांच्या प्रेमाचा वर्षाव होत आहे.
लाराचा लुक इतका सुंदर जमून आला आहे की इंदिरा गांधींच्या भूमिकेत लाराला ओळखणे देखील कठीण झाले आहे. लाराच्या मेकअप आर्टिस्टचे देखील कौतुक होत आहे. लाराचा लुक बदलण्यासाठी तिच्या मेकअप आर्टिस्टने घेतलेली मेहनत सिनेमाच्या ट्रेलरमधून दिसून आली आहे. लाराच्या मेकअप आर्टिस्टला नॅशनल अवॉर्ड द्या अशी मागणी केली जात आहे. कारण लाराच्या मेकअप आर्टिस्टने हुबेहूब इंदिरा गांधींचा लुक लारा दिला आहे. त्यांच्या सफेद केसांची पट्टी,त्यांचे कपडे, त्याचा ठहेराव हे सगळ इतक्या सुंदर पद्धतीने जमवून आणले आहे की हुबेहूब इंदिरा गांधी डोळ्यासमोर उभ्या राहतात.