सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: पिंपरी , बुधवार, 9 जून 2021 (08:09 IST)

साडीच्या झोळीत खेळणाऱ्या १२ वर्षांच्या मुलाचा गळ्याला फास लागून मृत्यू

घरात बांधलेल्या साडीच्या झोळीत खेळणाऱ्या १२ वर्षांच्या मुलाचा गळ्याला फास लागून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना येथील इंद्रायणी कॉलनीत  घडली. दिनेश गुप्ता (वय १२) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत आफरीन वसीम खान (रा. इंद्रायणी कॉलनी, कामशेत) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
 
बुद्धिलाल जानकिप्रसाद गुप्ता हे पत्नी व चार मुलांसह खान यांच्या शेजारी राहतात. गुप्ता यांच्या घराच्या बाहेरील गेटला कुलूप होते. तसेच, त्यांच्या घराच्या गॅलरीत गुप्तांची मुले दिनेश व राज (वय ७) साडीच्या बांधलेल्या झोळीवर खेळत असल्याचे खान यांनी पावणेसातच्या सुमारास पाहिले होते. त्यांनी थोड्या वेळाने घराबाहेर येऊन पाहिल्यावर दिनेशच्या गळ्याला साडीचा फास लागलेला दिसला. खान यांनी लगेच भाऊ तौफिक याला गुप्तांच्या घराचे कुलूप तोडायला लावले. त्यानंतर दिनेशच्या गळ्यातील फास काढल्यावर तो जमिनीवर निपचित पडला. काहीही हालचाल करीत नव्हता. त्यामुळे त्याला उपचारासाठी तातडीने संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.