बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 24 मे 2021 (15:16 IST)

‘कार्तिक' दिसणार पायलटच्या भूमिकेत

बॉलिवूडमधील युवा अभिनेता कार्तिक आर्यनने खूपच कमी कालावधीत स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. कार्तिकने आपल्या दमदार अभिनयाच्या मदतीने अनेक नवीन चित्रपट साईन केले आहेत. आता त्याने साजिद नाडिाडवाला याचाही एक चित्रपट साइन केला आहे. हा चित्रपट पूर्णपणे कमर्शिअल असणार असून तो एका सत्य घटनेवर असलेला एक देशभक्ती चित्रपट असणार आहे. या चित्रपटात कार्तिक हा एका एअरफोर्स पायलटच्या भूमिकेत झळकणार आहे. यात तो एका रेस्क्यू ऑपरेशनचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
 
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास कार्तिकचे अनेक चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. तो अनिस बझ्मीच्या हॉरर कॉमेडी भूलभुलैया-2 चित्रपटामुळेही चर्चेत आहे. याशिवाय तो धमाका आणि लुका छुपी-2 मध्येही मुख्य भूमिका  साकारणार आहे.