रविवार, 4 डिसेंबर 2022
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Updated: सोमवार, 24 मे 2021 (12:09 IST)

मनाली जाण्याची योजना असेल तर एकदा नक्की वाचा

मनाली अत्यंत सुंदर हिल स्टेशन आहे. मनाली हिमाचल प्रदेशाच्या कुलू जिल्ह्यातील निसर्गसुंदर शहर असून हे व्यास नदीच्या काठावर वसलेले आहे. बर्फाच्छादित पर्वतशिखरे, उत्तुंग देवदार वृक्ष, जवळून वाहणारा व्यास नदीचा प्रवाह, थंड व आल्हाददायक हवामान यांमुळे मनाली हे पर्यटकांचे एक आकर्षण ठरले आहे.
 
तुम्ही मनालीला जाण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी आणल्या आहेत. ज्या जाणून घेणे आवश्यक आहे.
 
जर आपण दिल्ली किंवा दिल्लीच्या आसपास राहात असाल तर आपण मनालीला जाण्यासाठी बस निवडू शकता. दिल्ली ते मनाली पर्यंत बस सेवा उपलब्ध आहे. मनालीला जाण्यासाठी 14 तास लागतात. याशिवाय तुम्हाला हवे असल्यास तुम्ही धर्मशाला येथून मनालीलाही भेट देऊ शकता. 
 
मध्य मनालीमध्ये पर्यटकांची संख्या बरीच जास्त आहे. त्याच वेळी जुन्या मनालीमध्ये फारच कमी पर्यटक राहतात. येथे तुम्हाला बजेटमध्ये बरीच हॉटेल सापडतील. 
 
हॉटेलमधील सुविधा तपासून घ्यावा. 
हॉटेल बुक करताना माहिती गोळा करावी.
मनाली मध्ये ट्रेकिंग, क्लाइंबिंग आणि पॅराग्लाइडिंगचा आनंद घेऊ शकता.
यासाठी आपल्याला मनालीमध्ये एखाद्या एजेंसीशी संपर्क करावा लागेल. 
येथे आपण पावसाळ्यात वॉटर राफ्टिंगचा आनंद घेऊ शकता आणि हिवाळ्यात स्कीइंगचा आनंद घेऊ शकता.
 
आकर्षण 
येथील हिडिंबा मंदिर, हिर्मादेवीचे धूंग्री मंदिर, नजीकचे मनुमंदिर या सर्व वास्तुसंबंधी पौराणिक आख्यायिका सांगितल्या जातात.
 
मनालीपासून 3 कि.मी. वर वसिष्ठ कुंड असून गंधकयुक्त गरम पाण्यासाठी ते प्रसिद्ध आहे. वसिष्ठ ऋषींनी तेथेच तप केल्याचे सांगितले जाते. हिमालयातील एक पुण्यक्षेत्र म्हणूनही ते विख्यात आहे. जगातील एक उंच रस्ता मनाली येथून निघून लडाखमधील लेह येथे जातो.